कुरुक्षेत्र : हरियाणात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर टॉप बोरर आणि पोक्का बोईंग किडीचा हल्ला झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यमुनानगर, कर्नाल, कुरुक्षेत्र आणि कॅथल या प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. पिकाच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत. शेतकरी आणि कृषी विभागातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऊसावर टॉप बोरर आणि पोक्का बोईंग या दोन किड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर, जवळपास ४० टक्के क्षेत्रात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या को ०२३८ ला याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, को ११८ आणि को १५०२३ या वाणांवर फारसा परिणाम झालेला नाही.
हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, हे सलग दुसरे वर्ष आहे, जेव्हा ऊसावर किडींचा फैलाव झाला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रोग पिकासाठी हानीकारक आहेत. पोक्का बोईंग ऊसाच्या अतिसंवेदनशील वाणांसाठी ४० टक्क्यांपर्यंत हानीसाठी जबाबदार असतो. ते म्हणाले की, गेल्या वर्षी या रोगाने उत्पादन प्रती एकर १००-२०० क्विंटल फटका बसला होता. यावर्षीही अशीच स्थिती निर्माण होवू शकतो.