महराजगंज : चालू वर्षीच्या उन्हाळ्यात, पायरिला किडीने महराजगंजच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सरकारच्या ऊस विभागाने या किडीबाबत आधीच शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. बदलत्या वातावरणात या किडीला रोखण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे खूप नुकसान होण्याआधी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदा महराजगंज जिल्ह्यातील सिसवा, ठुठीबारी, घुघली, निचलौल, गडोरा विभागात जवळपास ४० हजार शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. मात्र, वातावरणातील ओलावा आणि तापमान यात उतार-चढाव सुरू असल्याने पिकास पायरिला किडीचा फैलाव होवू लागला आहे. कृषी संशोधकांनी शेतकऱ्यांना किड नियंत्रणाचे उपाय सांगितले आहेत. ऊस अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी पायरिला किडीला रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी इमिडाक्लोरोपिड १५०-२०० मि.ली अथवा प्रोफेनोफास ७५० मि.ली. हे किटकनाशक ६०० लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी असे सांगितले. ऊस विभागाने या किडींबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असल्याचे ते म्हणाले.