मुजफ्फरनगर: तितावी साखर कारखान्याच्या पाहणीसाठी शुक्रवारी जिल्हा ऊस अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी दाखल झाले. साखर कारखान्यातील ट्रीटमेंट प्लान्टसह सर्व कामकाजाचे निरीक्षण या पथकाने केले. या पथकाकडून लखनौ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यात आला आहे.
काही स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी डी. एम. सेल्वा कुमारी जे. यांच्याकडे कारखान्यातील ट्रीटमेंट प्लान्ट बंद असल्याची तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, स्थानिक प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे के. जे. विपूल कुमार यांसह अन्य कर्मचारी कारखान्याच्या पाहणीसाठी पोहोचले. यावेळी त्यांनी ट्रीटमेंट प्लान्टमध्ये वापरले जाणारे साहित्य आणि इतर साहित्याची पाहणी केली. जे. विपुल कुमार यांनी सांगितले की, तितावी साखर कारखान्याची पाहणी करण्यात आली आहे. हा रिपोर्ट लखनौमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करू. त्यानंतर दंडाची कारवाई होईल. कारखान्यातील ट्रीटमेंट प्लान्ट सुरू नसल्याचे विपुल कुमार यांनी सांगितले.