मुंडेरवा (बस्ती) : नूतन जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल यांनी साखर कारखान्याची पाहणी केली. कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या तोलाई केंद्रावर पोहोचून त्यांनी सर्व सहा तोलाई केंद्रांची पाहणी केली. ट्रॉली, ट्रकच्या वजनकाट्यांचे परिक्षण करण्यात आले.
कारखान्याच्या व्यवस्थापनाने ११ मार्च रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत गळीत हंगाम बंद करण्याची घोषणा केली आहे. भारतीय किसान युनीयनचे मंडल उपाध्यक्ष दिवाल चंद्र पटेल यांनी सांगितले की, अद्याप शेतांमध्ये ऊस शिल्लक आहे. जर कारखाना बंद केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यांनी पु्न्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी रंजीत कुमार निराला आणि सरव्यवस्थापक ब्रजेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील काही गावांमध्ये अद्याप ऊस शिल्लक आहे. शेतकऱ्यांना ऊस पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याचे मुख्य ऊस व्यवस्थापक कुलदीप द्विवेदी, ज्येष्ठ ऊस अधिकारी डॉ. उपेंद्र सिंह, वीर बहादुर सिंह, के. पी. सिंह, धिरेंद्र प्रजापती आदी उपस्थित होते.