पेरंम्बदूर : तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या ऊस संशोधन केंद्र (कुड्डालोर) (Tamil Nadu Agricultural University) च्या द्विसदस्यीय पथकाने बुधवारी येथे उभ्या ऊस पिकाची पाहणी केली. हा ऊस पोक्का बोईंग रोगग्रस्त आहे. त्यातून पिकाचे मोठे नुकसान होवू शकते. कुड्डालोर ऊस संशोधन केंद्राचे प्रा. एम. जयचंद्रन (कृषी शास्त्रज्ञ) आणि सहाय्यक प्रा. एस. थंगेश्वरी (रोप रोग विज्ञान) या पथकाने पुदुवेट्टाकुडीमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. सार्वजनिक क्षेत्रातील पेरुंम्बदूर साखर कारखाना लिमिडेटद्वारे नोंदणी केलेल्या ऊस पिकाला रोगाचा फटका बसला आहे. गावातील काही शेतांमध्ये पिकांची पाने रोगग्रस्त झाली आहेत.
संशोधकांनी वेप्पुर पंचायत संघाच्या नल्लारिक्कई गावात आयोजित एका बैठकीत पुदुवेत्ताकुडी, मारुथायनकोवेल आणि इतर गावातील शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. पिकाच्या बचावासाठी मार्गदर्शन केले. पोक्का बोईंग व इतर आजारांच्या नियंत्रणासाठी उपाय सांगितले. डॉ. जयचंद्रन यांनी ‘द हिंदू’ला सांगितले की, गेल्या सहा महिन्यात तामिळनाडूच्या काही भागात ऊसावर दोन प्रकारच्या पोक्का बोईंग किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सरकारच्या प्रयत्नांनी त्यावर आळा घालण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना आधीच बुरशीनाशके आणि कीटकनाशके वापरण्यासारख्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी शिफारशी अंमलात आणल्या आहेत. काही ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर परिणाम झाला आहे. सध्या कोरडे हवामान आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. पेरुंम्बदूरची स्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, काही शेतांमध्ये पिकात बोरॉनची कमतरता दिसून आली आहे. काही शेतात इंटर नोड बोरर, मिली बग, पाने पिवळी पडणे, विल्ट रोगांचा प्रभाव दिसून येत आहे.