कोल्हापूर, दि. 9 : साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे यात शंका नाही, पण खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलना ऐवजी सलोख्याचा मार्ग काढून ऊस तोडणी करण्यासाठी मार्ग मोकळा करावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे केले.
महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील म्हणाले साखर कारखान्यांनी या पार्टीबाबत कोणतीही तडजोड करू नये ज्या ज्या कारखान्यांची जी एफ आर पी होते ती दिलीच पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. मात्र शेतातील उभा ऊस कारखान्यांनी तत्काळ सोडावा अशी शेतकऱ्यांची ही मागणी आहे याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.