मऊ : जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी साखर कारखाना तथा ऊस विकास विभागाच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, घोसी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१ मध्ये एकूण १२.७३ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. सद्यस्थितीत ऊस विकास विभागाच्यावतीने ऊस विकास परिषद तथा ऊस समिती घोसीच्या स्तरावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा फिडिंग, प्रदर्शन, घोषणापत्र नोंदणी, आधार फिडिंग तथा शेअर प्रमाणपत्र वितरण करण्यात येत आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगाम २०२१ साठी पूर्वहंगामी उसाला ३५० रुपये प्रती क्विंटल, नियमित ऊसाला ३४० रुपये तर इतर प्रजातीच्या उसाला ३३५ रुपये प्रती क्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण ऊस मूल्याच्या ८१ टक्के रक्कम देण्यात आली आहे. उर्वरीत ऊस बिले तातडीने द्यावीत असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. याशिवाय साखर कारखान्याने देखभाल, दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण करावे, तरच कारखान्याचा गळीत हंगाम नियमित सुरू राहिल असे निर्देश दिले. त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना उसाच्या नोंदणीचे प्रदर्शन करून आकडेवारी तपासण्याची सूचना केली. यावेळी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांसह घोसी साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.