मलेशिया: साखर उत्पादक कंपन्यांना दररोज साखर उत्पादन अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुत्रजया : मलेशियातील दोन मुख्य साखर उत्पादक कंपन्या, MSM मलेशिया होल्डिंग्स Bhd (MSM ) आणि सेंट्रल शुगर रिफायनरी सदन Bhd (CSR)ला मे महिन्यापासून दररोज साखर उत्पादन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशात साखरेच्या पुरवठ्यात अडथळे येऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

डोमॅस्टिक ट्रेड अँड लिव्हिंग एक्स्पेंडिचर मंत्री दातुक सेरी सलाहुद्दीन आयुब यांनी सांगितले की, जेव्हा अनेक राज्यांमध्ये साखर पुरवठ्याचे संकट निर्माण झाले होते, तेव्हापासून या दोन कंपन्यांमध्ये मे महिन्यात दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री म्हणाले की, हा उपाय साखरेचा पुरेसा पुरवठा निश्चित करण्याच्या उपायांपैकी एक आहे. पुढील आठवड्यात हरि राया एदिलधा उत्सव असल्याने ही दक्षता घेण्यात आली आहे.

ते म्हणाले की, आम्ही उत्सवापूर्वी गांभीर्याने साखरेच्या पुरवठ्याकडे लक्ष देत आहोत. याशिवाय, ते म्हणाले की, ऑप्स मनिस अभियानाच्या सुरुवातीनंतर साखरेचा पुरवठा स्थिर असल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खलानमध्ये, खास करुन केलंटनमध्ये चिंता व्यक्त होत होती. एप्रिल महिन्यात बाजारात एक किलो साखरेचे पाकिट मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

सल्लाहुद्दीन यांनी सांगितले की, सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेजारील देशांना साखरेसह इतर वस्तूंचा चोरटा पुरवठा होवू नये याची दक्षता घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here