फगवाडा : गोल्डन संधार शुगर मिल लिमिटेडने ऊस बिले न दिल्याबद्दल कारखान्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया कपूरथलाचे उपायुक्त विशेष सारंगल यांनी सुरू केली आहे. उपायुक्तांनी याबाबत सर्व २२ डीसींना पत्र लिहिले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, जालंधर विभागाचे कृषी आयुक्त, मोहालीच्या ऊस आयुक्तांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याने २०२१-२२ पर्यंत ऊस उत्पादकांचे १२२.३९ कोटी रुपये देणे होते. त्यापैकी २३ मे अखेरपर्यंत ८६.६४ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. तर ३५.७५ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. सारंगल यांनी सांगितले की, नियमानुसार, जर ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांना बिले दिली गेली नाहीत, तर १५ टक्के वार्षिक व्याजाने ऊस बिले शेतकऱ्यांना द्यावी लागतात.