गळीत हंगामापूर्वी चाचणी घेण्याचे कारखान्यांना निर्देश

सठियाव : देवरिया परीक्षेत्राचे ऊस उपायुक्त के. उषा पाल यांनी सठीयाव साखर कारखान्याची पाहणी केली. यावेळी आढळलेल्या त्रुटी त्वरीत दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर त्यांनी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत ऊस उत्पादन आणि पुरवठ्याबाबत माहिती घेतली.

सठियावर साखर कारखान्याचा गळीत हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. सोमवारी ऊस उपायुक्तांनी कारखान्याची पाहणी केली. तयारीचा आढावा घेतला. त्यातील दोष दूर करण्याचे निर्देश दिले. या महिन्यात चाचणी पूर्ण करावी अशी सूचना केली. त्यानंतर कारखाना परिसरात ऊस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडून ऊस खरेदी केंद्रांचा आढावा घेतला. आजमगड कारखान्याकडे ५७ लाख क्विंटल, मऊ कारखान्याकडे ३५ लाख क्विंटल, बलिया कारखान्याकडे ७ लाख क्विंटल, देवरिया कारखान्याकडे ५० लाख क्विंटल ऊस सर्वेक्षणानुसार उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

आजमगडचे जिल्हा ऊस अधिकारी अशर्फी लाल, मऊचे जिल्हा ऊस अधिकारी सुनील कुमार, बलियाचे जिल्हा ऊस अधिकारी प्रदीप कुमार, देवरियाचे जिल्हा ऊस अधिकारी आनंद शुक्ला यांसह कारखान्याचे सरव्यवस्थापक देवेंद्र प्रताप सिंह, मुख्य ऊस अधिकारी डॉ. विनय प्रताप सिंह, व्ही. के. यादव, मुख्य अभियंता मायाराम यादव, वैष्णव तिवारी, अजय कुमार वर्मा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here