अहिल्यानगर (अहमदनगर) : बोधेगाव (ता. शेवगाव) येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन भारतीय पोस्ट विभागाच्या ग्रामीण टपाल विमा योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे. कारखान्याच्या दोनशे कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. केदारेश्वर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, जेष्ठ संचालक त्रिंबक चेमटे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार यांचे हस्ते कारखान्याच्या दोनशे कामगारांना विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले.
माजी चेअरमन प्रतापराव ढाकणे, विद्यमान चेअरमन ऋषिकेश ढाकणे तसेच सर्व संचालक मंडळ आदींच्या प्रयत्नांनी ही योजना लागू करण्यात आली आहे. योजना राबवण्यासाठी अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी. नंदा, सोमनाथ तांबे, पोस्ट मास्तर कृष्णकांत शिरसाठ, शेवगाव डाक विभागाचे पोस्टल अधिकारी रामेश्वर ढाकणे यांनी विशेष सहकार्य केले. योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टल अधिकारी रामेश्वर ढाकणे यांनी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करून एकाच दिवशी दोनशे पॉलिसी तसेच तीस लाख रुपये प्रीमियम घेण्याचा एक वेगळा विक्रम केला.