कारखान्यांनी एफआरपीसह व्याजही द्यावे

शेतकऱ्यांची कारखान्यांकडे मागणी : ऊस उत्पादक आंदोलनाच्या पवित्र्यात

कोल्हापूर, दि. 13 : शेताततून ऊस तोडून नेल्यानंतर चौदा दिवसात एफआरपीची रक्कम देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. मात्र तीन महिने झाले तरीही एफआरपीची रक्कम ज्या कारखान्यांनी दिलेली नाही, त्या साखर कारखान्यांनी कायद्यानूसार थकीत एफआरपीवर व्याजाची रक्कम दिली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
देशात सुमारे 18 हजार कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. यावर जेवढ्या दिवसापासून एफआरपी थकवली आहे. तेवढ्या दिवसाचे आत्तापर्यंत किंमान 250 ते 300 कोटी रुपयांचे व्याज होते. त्यामुळे कारखान्यांनी कोणत्या कारणासाठी एफआरपीची रक्कम थकवली हा त्यांचा प्रश्‍न आहे. मात्र, उसाची एफआरपी चौदा दिवसात देणे बंधनकारक असतानाही ज्या कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. त्यांनी मात्र कायद्याप्रमाणे थकीत एफआरपीच्या रक्कमेसह व्याजही दिले पाहिजे, यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारी आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात एफआरपी थकीत आहे. केंद्र सरकारने एफआरपीचा कायदा करतानाच पंधरा दिवसात एफआरपी देण्याचे स्पष्ट केले आहे. आता मात्र याच कायद्याचा सरकारने आणि साखर कारखान्यांनी पालन केले पाहिजे, अशीही मागणी होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील हे तीन आंदोलनाबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे एफआरपीसह व्याजाची रक्कम द्यावी यासाठी आंदोलन पेटण्याची शक्‍यता आहे.

एफआरपीचा कायदा करताना चौदा दिवसात एफआरपी द्यावी, अन्यथा त्यावर व्याजाची रक्कम आकारली जाईल. असे सांगितले आहे. आता ठरलेल्या वेळेत एफआरपी दिली जात नाही, त्यामुळे कारखान्यांनी एफआरपीसह पंधरा टक्के व्याज दिले पाहिजे.
भगवान काटे, शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष

एफआरपी चौदा दिवसात द्यावी लागते:
एफआरपीची रक्कम चौदा दिवसात द्यावी लागते. जर ही रक्कम दिली नाहीतर त्यावर 15 टक्के व्याज द्यावे लागते. याबाबात माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
सचिन रावल
प्रादेशिक साखर सहसंचालक, कोल्हापूर

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here