पुणे: ऊस उत्पादकांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट नेहमीच अग्रेसर असते . यातीलच एक पुढचे पाऊल म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे, महाराष्ट्र तर्फे आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून यंदाही याला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.
चिनीमंडी न्यूज शी बोलताना, व्हीएसआयचे महासंचालक मा. श्री. शिवाजीराव देशमुख असे म्हणाले कि, साखर आणि संलग्न उद्योगात टिकाव आणि नावीन्यता या विषयावरती वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे, आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन आयोजित करत आहे. तसेच ते म्हणाले, “हा व्हीएसआय चा एक प्रमुख कार्यक्रम आहे, ज्यात नामांकित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वक्ते साखर आणि संबंधित उद्योगाच्या महत्त्वपूर्ण भिन्न बाबींवर व्याख्यान देतील. साखर आणि संबंधित उद्योगांच्या ,तंत्रज्ञांच्या या सर्वात मोठ्या मंडळामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचे 2000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे जे या परिषदेच्या वेळी त्यांचे विचार, कल्पना आणि अनुभव सांगतील.याशिवाय या तीन दिवसांच्या कार्यक्रमात साखर व संबंधित उद्योगाच्या सुधारणेसाठी संशोधन वैज्ञानिक, अभियंता, तंत्रज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञांच्या नवकल्पनांची सखोल चर्चा होईल. ”
परिषदेच्या संयुक्त विद्यमाने, “साखर उद्योगाच्या उत्पादनांचे आणि सेवांचे एकत्रीत प्रदर्शन .” हे देखील आयोजित केले गेले आहे ज्यात आम्ही आपले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन करणारे नवीन उपक्रम,उत्पादने आणि सेवा यांचे प्रदर्शन करीत आहोत. ऊस आणि संबंधित उद्योगांपासून छोट्या व मध्यम उद्योगांपर्यंत 200 हून अधिक सेवा प्रदात्यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची ही एक नामी संधी आहे.
या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने ऊस लागवड तंत्रज्ञानातील नाविन्यता व त्यांचे थेट प्रात्यक्षिक, साखर उद्योगाचे प्रदर्शन, उसाचे वाण, सिंचन कार्यपद्धती, आंतरपीक लागवड, वेगवेगळ्या कृषी पद्धती तसेच कीटक आणि रोगांचे व्यवस्थापन याविषयी चर्चा व मार्गदर्शन होईल”.
या साखर परिषदेचा आणखीन एक पैलू म्हणजे. प्रसिद्ध टेक्नोप्लाट्स संशोधक आणि नवोदित वैज्ञानिक यांच्या नवीनतम नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहे.
हा भव्य कार्यक्रम सोहळा 31 जाने 2020 पासून 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत असणार आहे. आणि या कार्यक्रम सोहळ्यासाठी ऊस उत्पादक, आंतरराष्ट्रीय लोक ,आंतरराष्ट्रीय पाहुणे व वैज्ञानिक, ऊस साखर आणि संबंधित उद्योगांशी निगडित लोक सहभागी होणार आहेत.
ही साखर परिषद व प्रदर्शन तसेच ऊस पीक प्रात्यक्षिक 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा:
ई-मेल: contact@vsiconindia2020.org
वेबसाइट: www.vsiconindia2020.org
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.