नवी दिल्ली : आयसीएआरने देशातील पहिल्या प्रो- व्हिटॅमिनयुक्त मक्क्याच्या दोन नव्या प्रजातींचे सादरीकरण केले आहे. यामध्ये समृद्ध मक्का बायोफोर्टिफाइड (जैवसंवर्धित) प्रजातींना रिलिज करण्यात आले आहे. बायोफोर्टिफाइड मक्क्याच्या नव्या प्रजातीचे नाव‘पुसा विवेक क्युपीएम ९ प्रगत’ आणि ‘पुसा एचक्युपीएम ५ प्रगत’ असे आहे. बायोफोर्टिफाइड (जैवसंवर्धित) प्रो-व्हिटॅमिन-ए मक्क्याच्या या प्रजाती सामान्य प्रजातींच्या तुलनेत सर्वोत्तम आहेत, असा दावा संशोधकांनी केला आहे.
कृषीजगत वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या प्रजातीचा मक्का चांगले उत्पादन देणारा आहे. साधारण मक्क्यामध्ये प्रो- व्हिटॅमिन-ए – १ से २ PPM, लायसिन- १.५ से २.० टक्के आमि ट्रिप्टोफॅन- ०.३ से ०.४ टक्के असतो. तर आताच्या बायोफोर्टिफाइड मक्क्याच्या नव्या प्रजातीपैकी पुसा विवेक क्युपीएम ९ प्रगत आणि पुसा एचक्युपीएम ५ प्रगतमध्ये लायसिन, प्रो-व्हिटॅमिन ए आणि ट्रिप्टोफॅनमध्ये वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिने या मक्क्याचे उत्पादन घेणेही अधिक हितवर्धक होणार आहे, असा दावा आयसीएआरच्यावतीने करण्यात आला आहे.