बिहारमध्ये इथेनॉल प्लांट उभारणीसाठी गुंतवणूकदार उत्सुक : मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटणा : गुंतवणूकदारांना सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन देतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुंतवणूकदारांना त्रास देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, इथेनॉल उत्पादनास मंजुरी मिळाल्यानंतर बिहारमध्ये उत्पादन वाढले आहे. त्यातुन युवकांसाठीही नवे द्वार खुले होत आहे. काही गुंतवणूकदारांनी इथेनॉल कारखाने उभारण्यात आपल्याला रुची असल्याचे सांगितले आहे. त्यांना खास करून त्रास देण्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना त्वरीत माहिती देण्याची सूचना केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
इन्व्हेस्टर्स मीट २०२२ मध्ये बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, राज्यातील इतर क्षेत्रांच्या विकासबरोबरच औद्योगिक विकासासाठीही सरकारने अनेक पावले उचलली आहेत. कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने या क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस दलात मोठ्या प्रमाणात भरती केली आहे. कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी प्रशासन आणि पोलीस सतर्क आहेत. त्यामुळे राज्यातील व्यवसायात वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here