पाटणा : बिहारसाठी जवळपास ३९,००० कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव मिळाले आहेत, अशी माहीती उद्योगमंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी दिली. यातील बहुतांश प्रस्ताव इथेनॉल उत्पादनाशी संबंधीत आहेत. मंत्री हुसेन हे उद्योग विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूक बैठकीत प्रतिनिधींशी चर्चा करीत होते.
द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री हुसेन यांनी सांगितले की, त्यांचे राज्य गतीने प्रगती करीत आहे. आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्याने औद्योगिकरण आणि आर्थिक विकासात प्रगती केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २,९०० एकरचा लँडपूल आहे. आणि गुंतवणूकदारांना औद्योगिक युनिट स्थापन करण्यास मदत पुरवली जात आहे. मंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी सांगितले एक खिडकी योजनेद्वारे एका आठवड्यात परवाने दिले जात आहेत. त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या लिज दरांना ८० टक्के घटवून २० टक्के करण्यात आले असून यातून बिहारच्या औद्योगिकरणाला आणखी गती मिळाली आहे.