गुवाहाटी : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOC) पूर्वोत्तर सात राज्यांमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ई १०) सुरू करण्याची योजना तयार केली आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आयओसीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, भारतात पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्यात येत होते. गेल्या दोन दशकापासून ही प्रक्रिया पूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे.
मात्र इथेनॉल पुरेशा प्रमाणा उपलब्ध नसल्याने पूर्वोत्तर राज्यांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. इंडियन ऑईलचे सर्व पंप १०० टक्के स्वयंचलित आहेत. यामध्ये ऑटोमेशन सिस्टीम इंधनाची योग्य गुणवत्ता आणि प्रमाण निश्चित करते असे त्यांनी स्पष्ट केले.