भुवनेश्वर : आयओसीएलने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सध्याच्या ११.८ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत IOCL ने २०२३ ला ‘स्ट्रेथनिंग दी ग्रीन रिजॉल्व’ वर्ष जाहीर करताना विविध योजनांचे अनावरण केले. यावेळी कंपनीच्यावतीने सांगण्यात आले की, कंपनीच्या बरगढमधील इथेनॉ प्लांट पुढील आर्थिक वर्षापर्यंत सुरू होणार आहे.