इराणकडून गेल्या ११ महिन्यांत ८,००,००० टन साखरेची आयात

तेहरान : इराणच्या Government Trading Corporation (GTC)ने दिलेल्या माहितीनुसार, इराणने यंदाच्या इराणी कॅलेंडर वर्ष २१ मार्च २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील पहिल्या अकरा महिन्यांत ८,१९,००० टन साखर आयात केली आहे.

जीटीसीचे वितरण आणि विक्री समन्वय विभागाचे संचालक होज्जत बाराताली यांनी सांगितले की, साखरेच्या धोरणात्मक पुरवठ्यात वाढ झाली आहे. आणि लवकरच बाजारात याची मागणी वाढेल, तेव्हा आमच्याकडे पुरेशी साखर उपलब्ध असेल. ते म्हणाले की आतापर्यंत देशांतर्गत उत्पादन आणि आयातीद्वारे पुरवठा यातून ४,८३,००० टन साखर बाजारात वितरीत करण्यात आली आहे. बाराताली यांनी सांगितले की, जर बाजारात साखर उत्पादनांचा पुरवठा सुरु राहीला तर या वर्षीच्या अखेरीस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साखर वितरण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here