इराक हरित हाइड्रोजन प्लांट स्थापन करणार : तेल मंत्री हयान अब्देल गनी

बगदाद : ओपेकचा सदस्य असलेल्या इराकने युद्धोत्तर रणनीतीचा एक भाग म्हणून दरवर्षी ८०० टन उत्पादन क्षमता असलेला पहिला हरित हायड्रोजन प्लांट तयार करण्याची योजना आखली आहे. तेल मंत्री हयान अब्देल घनी यांनी ही माहिती दिली. बगदाद मधील ऊर्जा परिषदेत मंत्री हयान अब्देल घनी यांनी सांगितले की, दक्षिण इराकमध्ये १३० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे.

अली कतीसाद न्यूज आणि इतर इराकी प्रकाशनांनी मंगळवारी प्रकाशित केलेल्या वृत्तांमध्ये मंत्री घनी यांनी म्हटले आहे की, तेल मंत्रालयाने दक्षिण रिफायनरीज कंपनीच्या मालकीचा ग्रीन हायड्रोजन प्लांट तयार करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. घनी म्हणाले की मंत्रालयाने अक्षय्य ऊर्जा कायदा तयार करण्यासाठी एक मसुदा तयार केला आहे. हा मसुदा मंजुरीसाठी संसदेकडे पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here