देशभरातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वैविध्यपूर्ण प्रकल्पांना संयुक्तरित्या कर्ज पुरवठा आणि कर्ज वितरण करण्यासाठी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लि. (इरेडा) ने इंडियन ओव्हरसीज बँकेसोबत (आयओबी) एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
विविध सेवांचा समावेश करून, या सामंजस्य करारामध्ये सर्व अक्षय/नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी संयुक्त -कर्ज आणि संयुक्त प्रारंभिक पाठबळ या तरतुदींचा समावेश आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट कर्ज वितरण आणि अंडररायटिंग (जोखीम) प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, इरेडा कर्जदारांसाठी ट्रस्ट आणि रिटेन्शन अकाउंट (TRA) चे व्यवस्थापन करणे आणि इरेडा कर्जासाठी 3-4-वर्षांच्या कालावधीत निश्चित व्याजदरांच्या दिशेने कार्य करणे हे आहे.
16 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील इरेडा च्या उद्योग केंद्रात इरेडा चे महाव्यवस्थापक डॉ. आर. सी. शर्मा आणि आयओबी चे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अनिल कुमार यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी इरेडा चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदिप कुमार दास, आयओबी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार श्रीवास्तव; आणि इरेडा चे संचालक (वित्त) डॉ. बिजयकुमार मोहंती उपस्थित होते.
या सामंजस्य कराराबद्दल इरेडा चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदिप कुमार दास म्हणाले: “इरेडा आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांच्यातील ही धोरणात्मक भागीदारी देशातील अक्षय उर्जेच्या वाढीला गती देण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
(Source: PIB)