दोन हजार रुपयाच्या नोटे बाबत अनेक चर्चा सुरु आहेत. कधी सरकार ही नोट बंद करणार असल्याचे कळते, तर कधी सरकारने ही नोट छापणे बंद केले असल्याचे समजते. आता सरकारनेच या मुद्याकडे लक्ष वळवले आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर दताना लिखित स्वरुपात सांगण्यात आले की, आता 2000 रुपयाची नोट बंद करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नाही. मात्र या नोटेची छपाई कमी करण्यात आल्याचे सरकारने मान्य केले आहे.
लोकसभेत बोलताना वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, सरकार कोणत्याही नोटेच्या छपाई च्या प्रमाणाबाबत भारतीय रिजर्व बँक (RBI) कडून सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेते, जेणेकरून जनतेच्या देण्या-घेण्याच्या मागणीला सुविधा जनक बनवले जावू शकेल.
त्यांनी सांगितले की, वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या दरम्यान 2000 रुपयाच्या नोटांच्या छपाईसाठी कोणत्याही प्रेस ला कोणतेही वेगळे निर्देश दिले गेले नाहीत. सरकार ने 2,000 रुपयाच्या नोटांची छपाई बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.