इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनकडून २०२१-२२ साठी जागतिक साखर तुटीच्या पुर्वानुमानात कपात

लंडन : International Sugar Organization (ISO) ने सोमवारी साखर हंगाम ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ यासाठी जागतिक साखर परवठ्यातील तुटीचे अनुमान २.५५ मिलियन टनाच्या आधीच्या अंदाजावरुन १.९३ मिलियन टन केले आहे. आयएसओने आपल्या तिमाही अद्ययावत अंदाज अहवालात म्हटले आहे की, १७२.४४ मिलियन टनाच्या खपाच्या अनुमानात घसरण हे या अंदाजात कपातीचे मुख्य कारण आहे. नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आलेल्या १७३.०३ मिलियनच्या आधीच्या पूर्वानुमानापेक्षा ते कमी होते.

२०२१-२२ मध्ये जागतिक साखर उत्पादन किरकोळ स्वरुपात वाढून १७०.५१ मिलियन टन करण्यात आले आहे. यापूर्वी मांडलेल्या १७०.४७ मिलियन टनाच्या अंदाजापेक्षा ते अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here