दरवर्षी एक दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याच्या क्षमतेबद्दल ISO वरिष्ठ सल्लागारांनी केले भारताच्या साखर उद्योगाचे कौतुक

नवी दिल्ली :मंगळवारी दिल्लीतील ६४ व्या ISO परिषदेच्या बैठकीत ‘ग्रीन हायड्रोजन: संभावना आणि आव्हाने’ विषयावरील चर्चेत ISO वरिष्ठ सल्लागार लिंडसे जॉली यांनी आपला दूरदर्शी दृष्टिकोन मांडला. ऊर्जेचा स्त्रोत म्हणून हायड्रोजनची क्षमता आणि साखर उद्योगाच्या भूमिकेबद्दल त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला.ऑटोमोबाईल तसेच ऊर्जा क्षेत्रासाठी इंधनाचा प्रमुख स्त्रोत म्हणून ग्रीन हायड्रोजनच्या विकासाबाबत आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले.

जॉली यांनी हायड्रोजनला ऊर्जा उद्योगातील स्विस आर्मी नाइफ आणि २०५० पर्यंत निव्वळ शून्य CO2 साध्य करण्यात एक प्रमुख खेळाडू म्हणून ठळक केले.’आयएसओ’च्या वरिष्ठ सल्लागाराने भारताच्या साखर उद्योगाचे दरवर्षी १ दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन करण्याच्या क्षमतेचे कौतुक केले. स्वच्छ हायड्रोजनच्या मागणी समोरील आव्हानेही त्यांनी अधोरेखित केली.

यासोबतच त्यांनी खर्च, स्टोरेज, वाहतूक, वितरण, पायाभूत सुविधा आणि नियामक फ्रेमवर्क आणि त्यावर मात करण्याचे मार्गदेखील सुचवले.भारताने २५ ते २७ जून दरम्यान नवी दिल्ली येथे ‘ISO परिषद बैठक’ आयोजन केले आहे.साखर आणि जैवइंधन क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ३० हून अधिक देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here