इस्रायलनकडून पॅलेस्टिनी भूभागावर हवाई, जमिनीवरील हल्ल्यात वाढ

नवी दिल्ली : इस्रायलच्या लष्कराने पॅलेस्टिनी भूभागावर हवाई आणि जमिनीवर हल्ले वाढवले आहेत. इस्रायली सैन्याने शुक्रवारी रात्री उत्तर गाझामध्ये प्रवेश केला. रिअर ॲडमिरल डॅनियल हागारी यांनी सांगितले की, लढा सुरूच आहे. गाझामध्ये जवळजवळ संपूर्ण ब्लॅकआउट आणि इंटरनेट बंद आहे. फोन सेवाही 12 तासांहून अधिक काळ बंद होती. इस्रायली भूदल त्यांच्या मोहिमेचा विस्तार करत आहेत. सोबतच हमासने खोदलेल्या बोगद्यांवर आणि इतर पायाभूत सुविधांवर व्यापक हवाई हल्ले चढवत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, ब्लॅक आउटमुळे गाझामधील जखमींपर्यंत रुग्णवाहिका पोहोचणे अशक्य बनत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना बाहेर काढणे शक्य नाही, असे त्यांनी ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. हमासने सांगितले की, त्यांचे सैनिक इस्रायली सीमेजवळील भागात इस्रायली सैन्यासोबत लढत आहेत. हमासची सशस्त्र शाखा, अल-कसाम ब्रिगेडने सांगितले की, त्यांचे सैनिक गाझाच्या ईशान्येकडील भागात लढत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here