ऊस पिकावरील किडींबाबत मार्गदर्शक सूचना जारी

अमरोहा : ऊस पिकाला किटकांपासून वाचवण्यासाठी ऊस विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. हवामानातील बदलामुळे विविध रोग पसरले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ग्रास हॉपर, पायरिया आदी रोगांपासून उसाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहेत.

वातावरणात बदल सुरू झाला आहे. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामान दिसत आहे. अशा स्थितीत ऊस पिकाची अधिक काळजी घेण्याची गरज असते. कारण हवामान बदलाचा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव लगेच होतो. शेतकऱ्यांनी वारंवार उसाची तपासणी करायला पाहिजे असे ऊस विभागाचे म्हणणे आहे. रोगाला आळा घालण्यासाठी तातडीने प्रयत्न केले नाहीत तर पिकाची वाढ खुंटते.

अमरोहा जिल्ह्यातल ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती केली जाते. दरवर्षी उसाची लागण वाढत चालली आहे. जिल्ह्यात सव्वा लाखांहून अधिक शेतकरी ऊस पिक करतात. जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, करपा यासारखे काही रोग उस पिकाच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत आढळतात. त्यामध्ये आधी उसाची पाने पिवळी पडतात. जर लवकर उपाययोजना झाली नाही तर पूर्ण पिकाला फटका बसतो. जिल्ह्यात उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. सध्या ती सुरू आहे. रोगग्रस्त पिकाची लागवड करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here