जळगाव : ऊस तोडणीवेळी मजूर बाजूला काढत असलेल्या वाड्याचा (उसाच्या वरचा भाग) पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विक्री करतात. मात्र, चारा टंचाईमुळे त्याचेही दर वधारले आहेत. मात्र, हा वाड्याचा भारा आता १०० रुपयांना ३०० कांड्यावर आला आहे. ऊस लागवड कमी झाल्याने महागाई झाल्याचे दिसून आले आहे. या चाऱ्याला खानदेशात वाढे किंवा बांडी म्हटले जाते. पूर्वी ही बांडी बरीच स्वस्त मिळत, असे मात्र वाढती मागणी, टंचाईमुळे आता याला अधिक दर मिळू लागला आहे.
पशुपालन करणारे शेतकरी वाढ्यांची बांडी गुरांना टाकून आपले श्रम कमी करतात. आता घटणाऱ्या ऊस लागवडीचा परिणाम बांडीच्या भावावर दिसून आला आहे. खानदेशात चाळीसगाव, यावल, चोपडा, अमळनेर या भागात याची विक्री अधिक होते. धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारात शहादा, तळोदा व नवापूर भागातच वाडे विक्रीस येते. दुधाळ पशुधनास ते उपयुक्त मानले जाते. यंदा ऊस बऱ्यापैकी आहे. परंतु चारा कमी असल्याने याचाही तुटवडा दिसत आहे.