बिजनौर: लखनऊ येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय गूळ महोत्सव ६ मार्चपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होईल.
महोत्सवात पहिल्यांदाच देशातील विविध राज्यांमधील गूळ उत्पादनाची आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रांचे प्रदर्शन केले जाईल. लखनौमधील गोमतीनगरमध्ये या प्रस्तावित गूळ महोत्सवासाठी राज्यातील गूळ उत्पादकांनाही बोलावण्यात आले आहे. गूळ उत्पादनाचे वेगवेगळे प्रकारही येथे पहावयास मिळतील. महोत्सवासाठी राज्यातील ७० गूळ उत्पादकांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधून १८ गूळ उत्पादक सहभागी होणार आहेत. यामध्ये बिजनौरमधील सात गूळ उत्पादकांचा समावेश आहे.
याबाबत सहायक साखर आयुक्त डी. पी. मौर्य यांनी सांगितले की, महोत्सवात पहिल्यांदाच गूळ आणि साखर निर्माण करणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीची यंत्रसामुग्री पाहता येईल. गुजरात राज्यातून अहमदाबाद, राजकोट, कानपूर येथील शुगर टेक्नॉलॉजी संस्था यांसह महाराष्ट्र, पंजाबमधील संस्थांकडून आपल्या यंत्रसामुग्रीची माहिती दिली जाईल.
महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होईल. महोत्सव सात मार्चपर्यंत सुरू राहील. राज्य गूळ महोत्सवाला शेतकऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याशी मुख्यमंत्री संवाद साधतील. मात्र, शेतकऱ्यांनी यास फारसा प्रतिसाद दिलेला नाही.