मुझफ्फरनगर : बाजारात गुळाच्या दराने साखरेपेक्षा मोठी भरारी घेतली आहे. सद्यस्थितीत गुळाचा दर साखरेपेक्षा ५ रुपयांनी अधिक आहे. देशी उत्पादन तंत्राने तयार होणारा गूळ साखरेच्या वरचढ ठरला आहे. बाजारात साखरेचा घाऊक दर ३६ रुपये किलो तर गुळाचा दर ४१ रुपये किलो आहे. मे महिन्यात सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतर गुळाचे दर वधारले आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या साखरेचा घाऊक दर ३६०० रुपये प्रती क्विंटल आहे. तर गुळाचा दर ४१०० रुपये क्विंटल आहे. मे महिन्यातील अवकाळी पावसाने गुळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यानंतर ८ मेपासून गुळाचे दर वाढतच चालले आहेत. यादरम्यान गुळाचा घाऊक दर ४४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सोमवाी गुळ चाकू १६३५ रुपयांचा ४० किलो विक्री झाली. अशा प्रकारच्या गाळाचा दर ४१०० रुपये क्विंटल आहे. तर साखरेचा दर ३६०० रुपये असून जीएसटीसह ३८०० रुपये दराने विक्री सुरू आहे. उत्पादन घटल्याने गुळाची दरवाढ झाल्याचे व्यापारी अचिंत मित्तल यांनी सांगितले.
गुळ मंडई असोसिएनचे अध्यक्ष संजय मित्तल यांनी सांगितले की, या वर्षी आशियातील सर्वात मोठ्या मंडईत गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन लाखाहून अधिक ढेपा कमी गुळ आहे. बडोदा, आणंद, जोधपूर आदी ठिकाणीही गुळ कमी असल्याने दर वधारलेले राहतील. गुळ मंडई असोसिएशनचे मंत्री श्याम सिंह सैनी यांनीही गुळाचे दर तेजीत राहतील अशी शक्यता व्यक्त केली.