कोल्हापूर : यंदा साखर कारखाने 15 नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याची परवानगी साखर आयुक्तांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपीसह ३,७०० रुपये दराची मागणी केली आहे. कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय गुळासाठी लागणाऱ्या उसाचा दर जाहीर होत नाही. त्यामुळे गुऱ्हाळघरे उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक गावांतील गुऱ्हाळमालक गुऱ्हाळे सुरू करावी की नको, या द्विधास्थितीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळ घरांची संख्या घटली आहे. जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शाहुवाडी, राधानगरी आदीसह अन्य तालुक्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच गुऱ्हाळ घरे शिल्लक आहेत. महागाईमुळे गुऱ्हाळाचा खर्च परवडत नसल्याची स्थिती आहे. मजुरांची टंचाई ही गुऱ्हाळघरांसमोरील मोठी अडचण आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.