श्रीगंगानगर : कमीनपुरा येथील साखर कारखान्यातील गुळ प्लांटमध्ये उत्पादनास बुधवारी सुरुवात झाली. कारखान्याचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुधीर कुमार, डिस्टिलरी चिफ त्रिकोलचंद दैन, रामपाल वर्मा, ग्लोबलचे पुनीत राणा, विवेक श्रीवास्तव, राजेश प्रसाद आदींनी विधीवत पूजा-अर्चा करून या प्लांटमध्ये एक ट्रॉली ऊस देऊन कामकाज सुरू केले. कारखान्याचे सहाय्यक महा व्यवस्थापक सुधीर कुमार यांनी सांगितले की, या प्लांटमध्ये सुरुवातीला ५०० क्विंटल गुळ उत्पादन केले जाईल. कारखाना प्रशासनाने या गुळाचा दर ६० रुपये प्रती किलो निश्चित केला आहे.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रशासनाने दहा आणि पाच किलोमध्ये गुळ पॅकिंग विक्रीची तयारी केली आहे. कारखान्यात आऊटलेट तयार करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. महाव्यवस्थापक भवानी सिंह यांच्यासोबतच्या बैठकीत आगामी आठवड्यात हा निर्णय होऊ शकतो. याशिवाय बॉटलिंग प्लांट विषयी प्रक्रिया सुरू आहे. एप्रिलमध्ये या प्लांटवर काम सुरू होऊ शकते. साखर कारखाना नियमित रुपात सुरू आहे. आतापर्यंत ९.६० लाख क्विंटल उसाचे गाळप करून ७.८८ टक्के उतारा मिळाला आहे. आतापर्यंत १.३२ लाख पोती साखर तयार करण्यात आली आहे. गेल्या हंगामातील १.३१ लाख साखर पोत्यांचा विक्रम यंदा मागे पडला आहे. आता कारखाना प्रशासनाने २.५० लाख क्विंटल ऊस आणखी येईल असे अनुमान व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षात प्रती क्विंटल ७० रुपयांची दरवाढ झाली असल्याने शेतकऱ्यांची रुची वाढली आहे.