जळगाव : ‘बारामती ॲग्रो’कडून १ लाख ८ हजार ८९२ टन उसाचे गाळप

जळगाव : ‘बारामती ॲग्रो’ने चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर २०२३-२०२४ या तिसऱ्या गाळप हंगामात १ लाख ८ हजार ८९२ टन उसाचे गाळप आणि ९९ हजार ९४२ क्विंटल एवढ्याच साखरचे उत्पादन आले. शेतकऱ्यांना बारामती ॲग्रोकडून २ हजार ६०० रुपये प्रतिटन प्रमाणे भाव देण्यात आला आहे. पहिला हप्ता २ हजार ४५० प्रमाणे अदा करण्यात आला आहे. उर्वरित १५० रुपये दिवाळीत देणार असल्याची माहिती ‘बारामती ॲग्रो’ने दिली आहे. चार नोव्हेंबर २०२३ ला गाळपास सुरवात झाली होती, आणि उसाच्या कमतरतेमुळे १९ फेब्रुवारी २०२४ रोजी गाळप हंगाम संपला.

‘बारामती ॲग्रो’ने २ हजार ४५० प्रमाणे १५ मार्चपर्यंतचे ७ कोटी ५० लाख रुपयांचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. ‘चोसाका’ला बारामती ॲग्रोने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतल्याने चोपडा कारखानास नवसंजीवनी मिळाली होती. मात्र उसाची कमतरता भरून काढण्यासाठी कारखाना क्षेत्रात ऊस लागवड योग्य जमीन, पाणी, असतानाही ऊसाअभावी, उसाच्या चांगल्या जातीच्या रोपांची लागवड, ऊस उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here