जालना : समृद्धी कारखान्याच्या उभारणीनंतर गेल्या बारा वर्षांत दुष्काळ, अतिरिक्त ऊस अशी अनेक संकटे आली. त्यावर मात करून कारखान्याने १०,००० मेट्रिक टन विस्तारीकरणाला सुरुवात केली आहे. या माध्यमातून घनसावंगी व अंबड तालुक्यात नवीन समृद्धी पर्व सुरू होत आहे, असे प्रतिपादन चेअरमन सतीश घाटगे यांनी देविदहेगाव (ता. घनसावंगी) येथे केले. कारखान्याचे १० हजार मेट्रिक टनाच्या विस्तारीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन सभासद, बिगर सभासद, शेतकरी, कारखाना कर्मचाऱ्यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
समृद्धी कारखान्याची गाळप क्षमता वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाचे एकही कांडे गाळपाविना शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली. कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी, पक्षनिरीक्षक गौतम गोलेच्छा, विस्तारक विजय कामड, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, जीवन वगरे, अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुण घुगे, विष्णू जाधव, गोविंद अर्दड, पांडुरंग भांगे, शिवाजी कंटुले, अॅड विनोद तौर, संचालक विक्की शिंदे, रणजित उढाण, दिलीप फलके, अभिजित उढाण आदींची उपस्थिती होती. बाबा उढाण यांनी सूत्रसंचालन केले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.