जालना – बागेश्वरी साखर कारखान्याकडून एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप : चेअरमन शिवाजीराव जाधव

जालना : येथील माँ. बागेश्वरी साखर कारखान्याने आत्तापर्यंत एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा ऊस जाणार असल्याची माहिती चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिली.माँ. बागेश्वरी साखर कारखाना परिसरात जवळपास ६ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. कारखाना रोज ५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत आहे. मार्चअखेरपर्यंत नोंदी असलेला व बिगर नोंदीचाही सर्व ऊस कारखाना उचलणार आहे. याबरोबरच पहिले पंधरवडी बिल प्रतिमेट्रिक टन २५०० प्रमाणे लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाल्याने परिसरात उसाचे क्षेत्र वाढत आहे. नवीन ऊस लावणाऱ्या शेतकऱ्यांनी कारखान्याला नोंद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ऊस 66 देण्याची घाई करू नये, आपला कारखाना यशस्वीरीत्या सुरू असून, मार्चअखेरपर्यंत शेतकऱ्यांचा नोंद असो अथवा नसो सर्व ऊस आणला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना आपला ऊस देऊ नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here