जालना : येथील भैरवनाथ शुगर वर्क्सच्या (युनिट क्र – ५) गळीत हंगामास सुरुवात झाली. बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम सावंत यांच्या हस्ते व शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आण्णासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी संचालक बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, अण्णासाहेब देशमुख, शिवाजीराव धुमाळ, बाबुराव घुले, विष्णू मुरकुटे, विठ्ठल चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अण्णासाहेब देशमुख म्हणाले की, भैरवनाथ शिवशक्ती साखर उद्योग समूह हा आपला सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे समाधानकारक गाळप करत असून आपण प्रत्येक सभासदांच्या ऊसाला योग्य तो दर देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले जात आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने ऊसाचे विक्रमी ऊसाची लागवड होणार आहे. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन त्यास जास्तीत जास्त दर दिला जाणार आहे.याप्रसंगी परिसरातील सभासद शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाशी भूम शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, कर्मचारी, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.