जालना : परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गंधक (सल्फर) भट्टीच्या स्फोटात दोन कर्मचारी जागीच ठार झाले. आबासाहेब शंकर पारखे (वय ४४, रा. शिरसगाव ता. परतुर) पर्यवेक्षक अशोक तेजराव देशमुख (रा. राहुरी ता. सिंदखेडराजा) अशी त्यांची नावे आहेत. तर या अपघातात दोन कर्मचारी जखमी झाले. जखमींवर परतुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी सायंकाळी गंधक (सल्फर) भट्टीचा स्फोट झाला. यात दोघे जागीच ठार झाले. तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. नवनाथ पांढरपोटे व कदीर पटेल (रा. वरफळ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मृत दोन कर्मचाऱ्यांचे शवविच्छेदन शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर नवल यांनी सांगितले. दरम्यान, या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.