जालना (महाराष्ट्र) : यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाला अंदाजे २९५० ते ३००० रुपये प्रती टन असा दर राहिल. त्यामुळे माँ बागेश्वरी साखर कारखान्याच्यावतीने पहिली उचल रुपये २५०० प्रति मे. टन व उर्वरित करारानुसार दोन समान हप्त्यांमध्ये एफ. आर. पी. प्रमाणे राहील. यावर्षीचे गाळपाचे उदिष्ट ६ लाख मे. टन ठेवले आहे असे प्रतिपादन माँ बागेश्वरी साखर कारखान्याचे संचालक अजय जाधव यांनी केले. येखे कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पूजन बुधवारी कारखान्याचे संचालक अजय जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
संचालक अजय जाधव म्हणाले की, यंदा उसाला प्रति क्विंटल २,९०० ते तीन हजार रूपयांचा भाव राहणार आहे. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्याने ४ लाख ७५ हजार ४१६ मे. टन ऊस गाळप केले. कारखान्याचा साखर उतारा ११.५६ टक्के राहीला आहे. याप्रमाणे निव्वळ येणारी एफआरपी २७०० रुपये ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करुन उदिष्ट पुर्ण केले आहे. कारखान्याचे जनरल मॅनेजर आर. आर. निर्वळ, डिस्टीलरी जनरल मॅनेजर बळवंत पाटील, वर्क्स मॅनेजर एस. एम. मोरे, मुख्य शेतकी अधिकारी पी. टी. खंदारे, ज्ञानेश्वर देशमुख, वर्क्स मॅनेजर एम. एम. नवनाळे, गजानन जाधव, एम. डी. कचवे, बी. जी. जाधव, पौळ, सचिन देशमुख, मुकेश वाघमारे, सचिन आव्हाड, हनुमंत मुंगळे, खाजा पटेल, मोरे, सपकाळ, विष्णू खरात उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.