जपानने बांगलादेशमधील साखर उद्योग, बायोमास ऊर्जा निर्मिती आणि प्रिपेड गॅस मीटर उद्योगात क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहे. जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशनचे (जेबीआयसी) गव्हर्नर नोबुमित्सु हयाशी यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी ढाका येथील शासकीय निवासस्थानात भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपले स्वारस्य व्यक्त केले. पंतप्रधानांचे भाषण लेखक मोहम्मद नजरुल इस्लाम यांनी बैठकीनंतर पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.
ढाका ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गव्हर्नर हयाशी म्हणाले की जेबीआयसी बांगलादेशातील विशिष्ट क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जपान आपल्या उद्योजकांना कर्ज देण्यास उत्सुक आहे. पंतप्रधान हसिना यांनी जपान सरकारच्या या ऑफरचे कौतुक केले. त्या म्हणाल्याकी, देशातील १५ साखर कारखान्यापैकी एक किंवा दोन जपानी गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात येतील. या संयुक्त उपक्रमांतर्गत प्रीपेड गॅस मीटरचा कारखाना उभारला जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. जपान हा बांगलादेशचा विश्वासू भागीदार आहे असे सांगून पंतप्रधान हसिना म्हणाल्या की, बांगलादेशी लोकांच्यावतीने मी जपानचे आभार मानते. बांगलादेश जपानच्या पाठिंब्याने अनेक मेगा-प्रोजेक्ट राबवत आहे.