ऊस दर वाढीसाठी भाकियू चे धरणे

कैथल : भारतीय किसान यूनियन (भाकियू) च्या सदस्यांची साखर कारखान्यात बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष सतपाल दिल्लोवाली होते. यामध्ये ऊस दराच्या वाढीबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर असा निर्णय घेतला की, साखर कारखाना कैथल वर एक फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन करतील. भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेत आहेत. शेतकरी श्रीमंत, गरीबांचे पोट भरतो, पण त्याचे पालपोषण करण्यासाठी सरकारतफै निश्चित दर दिला जात नाही. चार वर्षांमध्ये सरकारकडून ऊसदरात कसलीही वाढ केलेली नाही, यामुळे शेतकऱ्यांच्यात संताप आहे. बीजेपी व जेजेपी च्या सरकार ने जी आश्वासने दिली होती त्यांची ताबडतोब अंमलबजावणी केली जावी. भाजप सरकारने शतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, पण आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यांनी ऊसदरात ४० रुपयांच्या वाढीची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना पिक मूल्याप्रमाणे पैसे मिळू शकतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here