कर्मवीर काळे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेआठ कोटी जमा : चेअरमन, आमदार आशुतोष काळे

अहिल्यानगर :कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० रुपये प्रती मेट्रिक टन याप्रमाणे ऊस दराचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याने यंदा गाळप हंगाम २०२३- २४ मध्ये प्रतिकूल परिस्थितीत आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढत विक्रमी ८ लाख ४५ हजार ७३३ मेट्रीक टन उसाचे गाळप करून ९ लाख ५४ हजार ८०० क्विंटल साखरेचें उत्पादन केले आहे व सरासरी साखर उतारा ११.२९ इतका राहिला आहे. आता कारखान्याने दुसरा हप्ता जमा करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माहिती चेअरमन, आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

ते म्हणाले, यंदा कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण करून चालू हंगामात यशस्वीरित्या ऊस गाळप हंगाम पूर्ण केला आहे.गळीत हंगाम २०२३ – २४ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे. त्यांना पहिली उचल मेट्रीक टन २ हजार ८२५ रुपये याप्रमाणे यापूर्वीच अदा करण्यात आलेली आहे. चालू वर्षी दमदार पाऊस होणार असल्याने कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी गळीत हंगाम २०२४-२५ करिता जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे.ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे.त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडी कराव्या, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here