पुणे : जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यानाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून “सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. गळीत हंगाम 2023-24 साठी देण्यात आलेला हा पुरस्कार कारखान्याच्या उद्योग क्षेत्रातील अग्रणी भूमिका आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या प्रतिबद्धतेचे प्रतीक आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पद्मविभूषण खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजीत पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते समर्थ उद्योग समुहाचे मार्गदर्शक राजेश टोपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अमरसिंह खरात, भागवत कटारे, सुधाकर खरात, नरसिंगराव मुंढे, पैठणे, मधुकर देशमुख, कैलास जिगे, सतीष होंडे, दत्तु जाधव, सखाराम भागवत, कैलास जारे, अशोक आघाव, भागिरथ कळंब, बी.टी. पावसे, डी.एस.ठोंगे आदी उपस्थित होते.