कर्मयोगी कारखान्याचे नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पुणे : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगामात आपण नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे १ नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

कारखान्याचा यंदाच्या हंगाम २०२३-२४ चा ३४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सोमवारी (दि. २३) त्यांच्या हस्ते झाला. यावेळी पूजा कारखान्याचे संचालक भूषण काळे व त्यांच्या पत्नी वृषाली काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, नीरा- भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

चेअरमन पाटील यांनी साखर रिकव्हरी ११ टक्क्यांपेक्षा जास्त मिळविण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या कार्यक्रमाला पराग जाधव, छगन भोंगळे, वसंत मोहोळकर, रतन देवकर, हनुमंत जाधव, भूषण काळे, विश्वास देवकाते, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, हिरालाल पारेकर, प्रदीप पाटील, शांतीलाल शिंदे, निवृत्ती गायकवाड, सतीश व्यवहारे, अशोक कदम, प्रवीण देवकर, माजी व्हाईस चेअरमन भागवत गटकुळ, माजी संचालक मानसिंग जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here