कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याने 2018-19 या हंगामात 10 लाख 48 हजार 216 टना ऊसाचे गाळप केले होते. या गाळप उसासाठी कर्मयोगीने एफआरपी पोटी 235 कोटी 85 लाख इतकी रक्कम सभासदांना अदा केली असल्याची माहिती कर्मयोगीचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्मयोगीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यावेळी उपस्थित होत्या.
ऊस बिलाबरोबरच कारखान्याच्या उस तोडणी वाहतुकदारांच्याही रकमा लवकरच संबंधीतांना वर्ग करणार असल्याची ग्वाही यावेळी पद्माताई भोसले यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, कर्मयोगीने गाळप झालेल्या उसाची उर्वरीत एफआरपीची संपूर्ण रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे. कारखान्याला केंद्र शासनाच्या नियमानुसार मागील हंगामात उत्पादीत केलेल्या साखरेपैकी कारखाना व थर्ड पार्टी कोट्यानुसार 4 लाख 70 हजार 880 क्विंटल साखर परदेशात निर्यात करावी लागली. यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि. नवी दिल्ली यांचे देशपातळीवरील दुसर्या क्रमांकाचे पारितोषिक कर्मयोगीला मिळाले. पारितोषिक वितरण समारंभ नवी दिल्ली येथे 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने ऊस उत्पादन घटले आहे. 2019-20 या येणार्या गाळप हंगामासाठी ऊसाच्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच जनावरांच्या छावणीसाठी ऊसाचा पुरवठा झाल्याने त्याचाही परिणाम ऊसाच्या उपलब्धतेवर होणार आहे. तरी देखील यंदाच्या हंगामात ठरलेल्या वेळेतच गाळप हंगाम सुरु करुन सभासदांच्या ऊसाचे गाळप करण्याचे कारखान्याचे ध्येय आहे. आपला सगळा ऊस कारखान्यासाठी द्यावा असे आवाहन यावेळी ऊस उत्पादकांना करण्यात आले.
यावेळी भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हणूंत जाधव, मच्छींद्र अभंग, अंकुश काळे, अतुल व्यवहारे, वसंत मोहळकर, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, रमेश जाधव, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, राजेंद्र चोरमले, जयश्री नलवडे, बाजीराव सुतार व सर्व खाते, विभागप्रमुख उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.