पानीपत इथेनॉल प्लांटसाठी कर्नालमधून २ लाख मेट्रिक टन पिकांचे अवशेष देणार

कर्नाल : पानीपतमध्ये IOCL सेकेंड जेनरेशन (२ जी) इथेनॉल प्लांटसाठी पिकांचे अवशेष उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात तीन स्ट्रॉ कलेक्शन यार्ड स्थापन करण्यात येत आहेत. येथे पिकांचे अवशेष प्रोसेसिंगनंतर ठेवले जातील आणि नंतर ते प्लांटमध्ये पाठविले जाणार आहेत. सिरसी, भांबरहेडी आणि गगसीना येथे हे यार्ड स्थापन केले होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ऑगस्ट रोजी IOCL सेकंड जेनरेशन (२जी) प्लांटचे उद्घाटन केले होते. या प्लांटमध्ये पिकांच्या उर्वरित भागातून इथेनॉलचे उत्पादन केले जाते.

कर्नालमध्ये एका हंगामात जवळपास ६ lakh MT भाताच्या पेढ्यांचे उत्पादन होते. यापैकी जवळपास २ lakh MT भाताच्या पेंढ्यांचा १० औद्योगिक युनिटसाठी केला जातो. तर उर्वरित पेंढ्या शेतकऱ्यांकडून मातीत मिसळल्या जातात. सरकारने उर्वरीत पेंढ्यांपैकी २ lakh MT भाताच्या पेंढ्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पाला (पाचट) जाळण्यावर बंदी घातली आहे.

दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उपायुक्त (डीसी) अनिश यादव यांनी सांगितले की, जिल्ह्यात पाला (पाचट) जाळण्यावर निर्बंध घातले आहेत. आणि यासाठी सीआरपीसी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आम्ही पूर्ण पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन निश्चित करू. पानीपत येथील इथेनॉल प्लांटसाठी २ लाख मेट्रिक टन पिक अवशेष उपलब्ध होतील याचे नियोजन केले जाईल.

भाताच्या कापणीपूर्वी कृषी विभागाने प्रगतशील शेतकऱ्यांसाठी २६० आणखी कस्टम हायरिंग सेंटर (सीएचसी) तयार केले आहेत. नव्या सीएचसीमुळे जिल्ह्यातील केंद्रांची संख्या ७०२ झाली आहे. उपायुक्त यादव म्हणाले की, आम्ही शेतांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांवर नजर ठेवली आहे. पिकांचे अवशेष जमा करण्यासाठी ग्रामीण, विभाग, उपजिल्हा तसेच जिल्हा स्तरावरील समित्यांची स्थापना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here