कर्नाल : नव्या सहकारी साखर कारखान्याचे कामकाज नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या गाळप हंगामात सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्फरमुक्त साखर उत्पादन करणारी हा हरियाणातील पहिला साखर कारखाना आहे. या वर्षीच्या सुरुवातीला नव्या साखर कारखान्याची चाचणी एक महिनाभर घेण्यात आली होती.
हिंदूस्थान टाईम्स डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक आदिती यांनी सांगितले की, कारखान्याची गाळप क्षमता २२०० टीसीडीवरुन वाढविण्यात आली आहे. आता कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता ३५०० इतकी आहे. एप्रिल महिन्यात कारखान्याची चाचणी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कारखान्यामध्ये १०.८३ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ९४,४६० क्विंटल रिफाईंड साखरेचे उत्पादन करण्यात आले होते असे सूत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link