बागलकोट : खासगी साखर कारखान्यांनी २०२१-२२ या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १९,३६४ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. अद्याप ३८१.७२ कोटी रुपये थकीत आहेत. हे पैसे लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती साखर खात्याचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी दिली.
द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री पाटील-मुनेनकोप्पा यांनी इशारा दिला की, ३१ मे २०२२ पर्यंत सर्व २४ साखर कारखान्यांनी थकीत ३८१.७२ कोटी रुपये दिलेले नाहीत. आणि जर पुढील काही दिवसांत हे कारखाने पैसे देण्यात अपयशी ठरले तर कारखान्यांच्या प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ते म्हणाले, २०२१-२२ यांदरम्यान ६.२२ लाख कोटी टन उसाचे गाळप करण्यात आले आणि कारखान्यांनी ५९ लाख टन साखर उत्पादीत केली आहे. मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक टन ऊसासाठी ३५०० रुपये दिले आहेत. तर इतर कारखान्यांनी साखर उताऱ्याच्या आधारावर शेतकऱ्यांना ३१०० रुपये प्रती टन या दराने पैसे दिले आहेत. मुनेनकोप्पा म्हणाले की, सरकारने इथेनॉल धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. सरकारकडून पांडवपुरा, मंड्या आणि बागलकोटमधील अडचणीतील साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.