कर्नाटक : Alpine Ethanol द्वारे नवा इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना

गदग : अल्पाइन इथेनॉल (Alpine Ethanol)ने कर्नाटकमधील गदग जिल्ह्यातील हिरेमल्लापूरा गावात २०० केएलपीडी क्षमतेचा धान्यावर आधारित डिस्टिलरी /इथेनॉल युनिट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. हे प्रस्तावित युनिट ३५.८८ एकराहून अधिक जमिनीवर असेल, असे सांगण्यात येते.

याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अल्पाइन इथेनॉल पर्यावरण मंजुरीच्या (ईसी) प्रतीक्षेत आहे आणि Q३/FY२४ मध्ये योजनेवर काम सुरू करण्याची अपेक्षा करीत आहे. कंपनीने अद्याप ठेकेदार व मशिनरी पुरवठादारांच्या निवडीस अंतिम रुप दिलेले नाही. नोव्हेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here