बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्याच्या मालकीच्या म्हैसूर साखर कारखाना प्रशासनासोबत एक ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण आणि सुधारणांच्या उपायांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, राज्याचे मुख्य सचिव रविकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याआधी राज्य सरकारने कारखान्याच्या खासगीकरणाचा निर्णय रोखला होता.
काँग्रेसचे गटनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी मंड्या येथे शेतकरी संरक्षण समितीने आयोजित केलेल्या एका आंदोलनात भाग घेतला होता. त्यामध्ये राज्य सरकारने ऐतिहासिक म्हैसूर साखर कारखान्याची मालकी कायम ठेवा अशी मागणी करण्यात आली होती. सिद्धरामय्या यांनी सांगितले की, म्हैसूर साखर कारखाा राज्यात सरकारच्या मालकीचा एकमेव कारखाना आहे. त्यामुळे कारखान्याचे खासगीकरण करण्याऐवजी तो राज्याच्या मालकीचा राहावा असे मी सरकारला आवाहन करतो.