हावेरी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते हावेरी जिल्ह्यातील त्यांच्या शिगगाव मतदारसंघात एका मोठ्या इथेनॉल उत्पादन युनिटची कोनशीला समारंभ करण्यात आला. या कोनशीला समारंभानंतर आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना बोम्मई म्हणाले, की, साखर कारखान्याच्या इथेनॉल युनिटमुळे ऊस उद्योगाला आर्थिक सशक्तीकरणास मदत होणार आहे.
त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने पर्यावरण संरक्षण, आर्थिक घडामोडी आणि शेतकरी कल्याणाबाबत संपूर्ण बाबी लक्षात ठेवून इथेनॉल धोरण तयार केले आहे. कर्नाटकला यापासून अधिक आर्थिक फायदा होईल अशी स्थिती आहे. काही साखर कारखान्यांनी इथेनॉल युनिट स्थापन केली आहेत. बोम्मई यांनी सांगितले की, मक्का आणि भातापासून इथेनॉल उत्पादनासाठी तरतुद करण्यात आली आहे. या नव्या युनिटपासून स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळेल आणि स्थानिक लोकांना, शेतकऱ्यांना तसेच युवकांना समृद्धीचा मार्ग सापडेल असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला.