मंड्या : मंड्या जिल्ह्यातील सरकारी मालकीचा मायशुगर साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद पडला आहे. हे युनिट सरकारच्या खासगीकरणाच्या योजनेबाबत चर्चेत आले आहे. मात्र, जुन्या म्हैसूर क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सातत्याने झालेल्या विरोधानंतर साखर कारखाना सुरू करण्याबाबत पावले उचलण्यात येत आहेत. दोन महिन्यात मंड्या येथील मायशुगर साखर कारखान्यात गाळप सुरू होणार आहे. मायशुगर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. पी. पाटील यांनी बुधवारी शेतकऱ्यांना हे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने साखर कारखाना प्रशासनाला यासाठी १५ कोटी रुपये दिले आहेत. आम्ही राज्य सरकारला तांत्रिक सल्लागारांचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये गाळप सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आम्ही पुण्यातील एका कंपनीला कारखान्याचे गाळप सुरू करण्याबाबत व्यवहारिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाटील यांनी सांगितले की, या अहवालानुसार आम्ही युनिटसाठी जमिन तयार केली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे. एम. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांना असेही सांगितले की, राज्य सरकारने २०२१-२२ या अर्थसंकल्पात कारखान्याचे गाळप सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.
कारखान्याच्या खासगीकरणाच्या चर्चेने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये राजकारणही सुरू झाले होते. मंड्याचे खासदार सुमालता अंबरीश यांनी कारखान्याला खासगी कारखान्यांना भाड्याने देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली, कारण कारखान्याचे कामकाज सुरू करण्यामध्ये गती येऊ शकेल. तर स्थानिक जेडीएस नेत्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. यांदरम्यान, मंड्या जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गोपालैया यांनी बुधवारी कारखन्याची पाहणी केली. त्यांनी सर्व संबंधीत घटकांची भेट घेतली. त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना गाळपासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत